Friday, May 17, 2024

मोठा निर्णय:अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता :मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी

प्रेरणा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दिली आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा

पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसंच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

 शेतकऱ्यांना दिवसा बीच देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार

११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता

( ऊर्जा विभाग)

पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार

(पशुसंवर्धन व दुग्धविकास)

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

( महसूल विभाग)

म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन

( वैद्यकीय शिक्षण विभाग)

आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ

( सार्वजनिक आरोग्य विभाग)

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

( परिवहन विभाग)

मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार.

उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता

( नगरविकास विभाग)

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते

( ग्रामविकास विभाग)

भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन

( महसूल व वन विभाग)

जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता

( परिवहन विभाग)

दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना

( पशुसंवर्धन व दुग्धविकास)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!