माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी सध्या संपूर्ण देशभर निवडणुकांचाच माहोल असल्याचा अनुभव लोकांना येत आहे. सर्वच
पक्ष अगदी जोमाने कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात तर प्रत्येक पक्षाने झोकून दिलं आहे. त्यातच निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे संपूर्ण देशासह राज्याचं लक्ष लागलं असताना
शरद पवार यांनी येत्या २-३ दिवसांत निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. त्यानंतर पुढच्या महिन्यात प्रक्रिया सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.सध्या देशात जे घडतंय, ते लोकशाही देशासाठी
हितावह नाही. त्यामुळे जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. नरेंद्र मोदींनी काय केलं? कोणती धोरणे आखली? कोणते प्रश्न सोडवले? असे प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केले. मुलीचं लग्न मोडले म्हणून
यवतमाळमध्ये शेतकऱ्यानं आत्महत्या केली, मी भेटलो. त्यानंतक दुसऱ्या दिवशी मी दिल्लीला जावून ७१ हजार कोटींचे कर्ज माफ केलं. मात्र, मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार याची गॅरंटी
दिली होती, त्याचं काय झालं? फक्त आश्वासनं द्यायची, याच्या पलीकडे काही नाही. राजकारणात गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही हे योग्य नाही.आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. संजय राऊत यांनी
लेखणीतून सरकार विरोधात लिहिले, तर त्यांना तुरुंगात टाकलं. देशमुख, केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात टाकलं. देश वाचवायचा असेल तर आम्हाला देशाच्या संविधानाची, घटनेची चिंता आहे.
या घटनेवर संकट आणण्याचं काम मोदी आणि त्यांचे सहकारी करतायेत. घटना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो, देशाला पर्याय देऊ असं सांगितलं. त्याची सुरुवात तुमच्यापासून
करतोय , त्याला साथ द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.