माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपने उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली.
यात तामिळनाडूतील ९ जागांचा समावेश आहे. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. आण्णामलाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चेन्नई साऊथमधून टी सुंदरराजन, चेन्नई सेंट्रलमधून
विनोज पी सेल्वन, वेल्लूरमधून ए. सी. शानमुगन, कृष्णगिरी मतदारसंघातून सी. नरसिम्हा, निलगिरी या राखीव मतदारसंघातून एल मुरुगन, पेरांबलूरमधून टी. आर. पेरिवेंदर, थुथूकुडीमधून नैनार नेगंद्रन,
कन्याकुमारीतून पोन राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 276 उमेदवारांची नावे जाहीर केली असून, उर्वरित उमेदवारांची
नावेही पक्ष लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने सर्वप्रथम १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यानंतर पक्षाकडून 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
आता पक्षाने तिसऱ्या यादीत 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.भाजपने दोन यादीतील २१ टक्के खासदारांची तिकिटे कापली आहेत. तिसरी यादी जाहीर करण्यापूर्वी भाजपने दोन याद्यांमध्ये
267 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ज्यात पक्षाने 21 टक्के विद्यमान खासदारांची तिकिटे कापली होती. दोन्ही यादीतून भाजपने 63 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली, त्यापैकी 2 जणांनी स्वतः निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.
चेन्नई सेंट्रल – तमिलिसाई सौंदर्यराजन
नीलगिरी – एल मुरुगन
कोयंबटूर – ए अन्नामलाई
चेन्नई सेंट्रल – विनोज पी सेल्वम
वेल्लोर- एसी शम्मुगम
कृष्णगिरि- सी नरसिम्हा
पेराम्बलुर – टी आर पारिवेंदर
थुथुक्कुड़ी – नेनार नागेंद्रन
कन्याकुमारी- पोन राधाकृष्णन