Saturday, April 27, 2024

शिर्डीसह या चार मतदारसंघांवरुन शिंदे गट – भाजपमध्ये तिढा ?

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये या चार जागांवरुन धुसफूस आहे. मात्र, शिवसेनेने आपल्या इच्छुक उमेदवारांची नावे भाजपकडे पाठवली. शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी याबाबतची

माहिती दिली आहे. या चारही जागा जिंकण्यासाठी लागणारे समीकरण आणि योग्य उमेदवार शिवसेनेकडे आहेत असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे या जागा शिवसेनेला मिळाव्यात असा आग्रह

शिंदे गटाकडून महायुतीमध्ये करण्यात आला आहे.सध्या महायुतीत वादात असलेल्या चारही जागी शिवसेनेचे खासदार आहेत. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे,

शिर्डीत सदाशिव लोखंडे आणि नाशिक लोकसभेत हेमंत गोडसे खासदार आहेत. यापैकी अरविंद सावंत आणि राजन विचारे सध्या ठाकरे गटात आहेत.काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह

मुंबईत आले होते. यावेळी अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. या बैठकीत अमित शाह यांनी भाजप मुंबईतील सहापैकी पाच जागा लढवेल,

असे स्पष्ट केले होते. तसेच लोकसभेच्या एकूण 32 मतदारसंघात आमचेच उमेदवार रिंगणात उतरली, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. एकनाथ शिंदे यांना या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, नरेंद्र मोदी

यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिंकून येणे हाच उमेदवारीसाठी एकमेव निकष असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. या निकषाचा

विचार करता भाजपचे उमेदवार शिंदे गटापेक्षा अधिक सक्षम असल्याचे अमित शाह यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतरही शिंदे गटाने माघार घेतली नव्हती. मुंबईसह नाशिक, ठाणे आणि शिर्डीची जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे अजूनही ठाम आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!