Thursday, April 9, 2026

निलेश लंकेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले, ‘राजकारण कधीही…’

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-02 at 7.54.58 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक

लढवण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा आहे. यावर निलेश लंके यांनी सूचक वक्तव्य केले आहे.निलेश लंके म्हणाले की, मला सकाळपासून

तीन-चार जणांचे फोन आले. मात्र मी काही त्या प्रक्रियेत नाही. ज्या माणसाविषयी बातम्या येत आहेत. त्यालाच याबाबत काही माहिती नाही. मला सकाळी काही लोकांचे फोन आले त्यांनी ही

गोष्ट मला सांगितली पण असं काहीही नाही. मला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो मी माझ्या मतदारांना विचारात घेऊन घेईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जाणाऱ्या

प्रश्न विचारला असता निलेश लंके म्हणाले की, राजकारण कधीही कोणत्या वळणावर जाऊ शकते, मी अजूनपर्यंत कुठल्याही शेवटच्या निर्णयापर्यंत आलो नाही. मी सध्या नगर दक्षिण लोकसभा

मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात जावून कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. आता निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!