Thursday, November 7, 2024

भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी महाराष्ट्रातून यांचे नाव…..

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीचे टप्पे १९ एप्रिलपासून देशभरात सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी

बार ४०० पार हा नारा दिला आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अशात भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे. या यादीत अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. पण जाणून घेऊ भाजपाचे स्टार प्रचारक कोण कोण आहेत?

भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोण कोण?

१) नरेंद्र मोदी

२) जे.पी. नड्डा

३) राजनाथ सिंह

४) अमित शाह<br>५) नितीन गडकरी

६) योगी आदित्यनाथ

७) प्रमोद सावंत

८) भुपेंद्र पटेल

९) विष्णू देव साई

१०) डॉ. मोहन यादव

११) भजनलाल शर्मा

१२) रामदास आठवले

१३) नारायण राणे

१४) अनुराग ठाकूर

१५) ज्योतिरादित्य सिंधिया

१६) स्मृती इराणी

१७) शिवराज चौहान

१८) के. अण्णमलई

१९) रवि किशन

२०) मनोज तिवारी

ही नावं आहेत. तर महाराष्ट्रातल्या नावांमध्ये पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांसह अशोक चव्हाण, अजित पवार, गिरीश महाजन यांचीही नावं आहेत.

महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?

१) एकनाथ शिंदे

२) अजित पवार

३) देवेंद्र फडणवीस

४) रावसाहेब दानवे

५) सम्राट चौधरी

६) अशोक चव्हाण

७) विनोद तावडे

८) पंकजा मुंडे

९) चंद्रशेखर बावनकुळे

१०) आशिष शेलार

११) सुधीर मुनगंटीवार

१२) राधाकृष्ण विखे पाटील

१३) पियूष गोयल

१४) गिरीश महाजन

१५) विजयकुमार गावित

१६) अतुल सावे

१७) धनंजय महाडीक

१८) अमर साबळे

१९) रविंद्र चव्हाण

२०) चंद्रकांत पाटील

भाजपाने एकूण चाळीस नावं असलेली ही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आल आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!