Tuesday, October 15, 2024

सुजय विखेंसाठी खुशखबर:अखेर राम शिंदेंची 

माय महाराष्ट्र न्यूज:खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील नाराजी अखेर दूर झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती केल्याने दोघांमधील वाद मिटला आहे. त्यामुळे खासदार डॉ. विखे यांना दिलासा मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपचे खासदार डॉ. विखे आणि आमदार प्रा. शिंदे यांच्यात मागील काही वर्षांपासून वितुष्ट आले आहे. दोघांमधील हा वाद जाहीर भाषणांमधून समोर आला. त्यात प्रा. शिंदे व आमदार नीलेश लंके यांची जवळीक मागील काही दिवसांत अधिक वाढली.

डॉ. विखे व प्रा. शिंदे हे जाहीर भाषणांतून एकमेकांवर नाव न घेता टीका करत होते. त्यातच प्रा. शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीवर दावा केला होता.त्यातून दोघांमधील सुप्त संघर्ष अधिकच वाढत गेला. दरम्यान, डॉ. विखे यांना भाजपने

उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात प्रा. शिंदे यांनी डॉ. विखे यांचा सत्कार करत पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र प्रा. शिंदे यांनी घुमजाव करत आपली नाराजी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडणार असल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे त्यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी घेतलेल्या या बैठकीस प्रा. शिंदे यांच्यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. विखे हे देखील उपस्थित असल्याचे समजते. या बैठकीत आपल्या शंका आणि अडचणींचे निराकरण फडणवीस यांनी केले असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.

वैयक्तीक मतभेद असले तरी ते निवडणुकीत काढायचे नसतात. उलट पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडायची असते. फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत खासदार डॉ. विखे यांच्याशी गळाभेट झाली नसली तरी हस्तांदोलन झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!