Sunday, October 6, 2024

नगर जिल्हा कोतवाल संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नेवासा

राज्यातील कोतवालांना संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा व इतर प्रलबित मागण्यासाठी नगर जिल्ह्यातील कोतवालांनी आज दि.24 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्यस्तरीय लक्षवेध आंदोलन, मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलबित मागण्या दि. 23 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण न झाल्यास शासनाच्या विरोधात नाईलाजास्तव शासनाचे लक्ष वेधण्याकरिता दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन, दि. 25 सप्टेंबर 2024 पासुन राज्यभर कामबंद आंदोलन तसेच दि. 26 सप्टेंबर 2024 पासून आझाद मैदान, मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन
करण्याचा इशारा कोतवाल संघटनेने दिला होता.मात्र शासन पातळीवर कोणती ही दखल न घेतल्याने राज्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्य संघटनेचे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर जिल्हा कोतवाल संघटनेने दि.24 रोजी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ, उपाध्यक्ष संदीप गाडेकर यांचेसह सुभाष महाशिकारे, अंकुश कोळेकर,
बाबासाहेब दरेकर, रामकृष्ण ससाणे,
मेघना दळवी, दादासाहेब वामन,शितल जाधव,किशोर गायकवाड,त्रिबक गीऱ्हे आदी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!