माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार शंकराव गडाख यांनी महायुती सरकारवर टीका करत स्वाभिमानी महाविकास आघाडी सरकार राज्यात आणण्याचा निर्धार मेळावा नेवासात घेतला.शिवसेनाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
कामाचे कौतुक करत, त्यांनीच मंत्रिपदावर संधी दिली. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच असून उद्धवसाहेबांबरोबरच राहणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील राज्यातील जनता महाविकास आघाडीलाच कौल मिळेल, असा विश्वास शंकराव गडाख यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नेवासा इथं निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्याला उत्स्फूर्त गर्दी होती. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी ही लोक इथं जमली असून आता राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार, संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या
शेतीमालाला रास्त भाव मिळणार, असा दावा शंकरराव गडाख यांनी यावेळी केला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नेवासा इथं निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्याला उत्स्फूर्त गर्दी होती. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी ही लोक इथं जमली असून
आता राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार, संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळणार, असा दावा शंकरराव गडाख यांनी यावेळी केला.