भेंडा प्रतिनिधी:नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील तिर्थक्षेत्र शिनाई देवस्थान भानसहिवरे चे उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी यांचे आशिर्वादाने व सर्व पंचक्रोषीतील शिनाई भाविक भक्त व सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आवेराज महाराजांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने सकाळपासून शिनाई देवस्थान येथे दिवसभर हजारो भाविकांची शुभेच्छा देण्यासाठी रिघ लागली होती. दिवसभरात आलेल्या सर्व भक्तांना अल्पोपहार देण्यात आला.
[ जिल्ह्यातील भाविकांची उपस्थिती…..आवेराज महाराजांचे चालू असलेले धर्म कार्य जिल्ह्यात पोहचले आहे. जिल्ह्यातील अनेक कार्यक्रम, किर्तन,यात्रा, विविध कार्यक्रमांना आवेराज महाराज स्वतःहा उपस्थित असतात.सकाळपासून – संध्याकाळपर्यंत महाराज विविध ठिकाणी भेट देत असतात. त्याचबरोबर शिनाई देवस्थान येथे आलेल्या भक्तांना मार्गदर्शन करतात यामुळे जिल्ह्यातील भाविकांनी महाराजांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.]