Saturday, December 21, 2024

नेवासा विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच घेण्याची आमची आग्रही मागणी असेल-सूरज चव्हाण

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

अब्दुल शेख यांच्या रुपाने नेवासा मतदारसंघ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक उमद नेतृत्व लाभलं आहे. ज्यांचा पक्षाला सार्थ अभिमान आहे. जनतेकडून पक्षाला तसेच पक्षाचे उमेदवार अब्दुलभैय्या शेख यांना मिळणारं प्रेम हे भारावून टाकणारं असून अजित दादा पवार यांच्याकडे अब्दुलभैय्या यांच्यासाठी तिकिटाची मागणी करणार असून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडवून घ्यावी अशी आमची आग्रही मागणी असेल असे स्पष्ठ मत अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केले.

नेवासा मतदारसंघातील कुकाणा येथे अब्दुल शेख यांचे वतीने आयोजीत संवाद मेळावा व स्वयंरोजगार शिबिरात मार्गदर्शन करताना श्री.चव्हाण बोलत होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते अब्दुल शेख, राष्ट्रीय युवकचे सचिव परमज्योत सिंग,विराट प्रतिष्ठानचे निलेशजी सरोदे,
राष्ट्रवादी नेवासा तालुकाध्यक्ष अशोक मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेवासा तालुकाध्यक्ष अभिराज आरगडे, उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडीचे मकरंद राजहंस, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गायकवाड, संजय वाल्हेकर,महेश कात्रस,
इम्तियाज शेख,अशपाक शेख, जुम्मा भाई, दरोडे, करण सरोदे आदि उपस्थित होते.

श्री.चव्हाण पुढे म्हणाले की,नेवासा विधानसभा मतदार संघाचे इच्छुक उमेदवार अब्दुलभैय्या शेख यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणजेच ही भव्यदिव्य गर्दी होय. युवक-युवती संघटना बांधणी, महिलांसाठी प्रत्येक स्तरावर केलेले विशेष काम, शासनाच्या सर्व सेवा वडिलधाऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी घेतलेले विशेष प्रयत्न, स्वखर्चातून समाजाच्या सर्वच स्तरातील जनतेसाठी केलेलं कार्य या सर्वांच फलित आज या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने मिळाल आहे.
अतिशय सर्वसामान्य परिस्थितितून आलेले राष्ट्रवादीचे खमके कार्यकर्ते म्हणून आज अब्दुल शेख यांचा अभिमान आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने झालेली ही गर्दी म्हणजे जणू काही राष्ट्रवादी पक्षाचा नेवासा तालुक्यातील एक नवीन जन्मच आहे.
यावेळी महीला शहराध्यक्षपदी अनिताताई देवखिळे, तालुका कार्याध्यक्ष अभय दादा तुवर, तालुका उपाध्यक्ष संभाजीराजे जाधव यांना पक्षाचे नियुक्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!