Thursday, November 7, 2024

किसान सन्मान निधीच्या हप्त्याची तारीख जाहीर शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा….

माय महाराष्ट्र न्यूज:सणासुदीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 9.5 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी, PM मोदी वाशिम येथे एक बटण दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या

बँक खात्यात जमा करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता.येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि 5 ऑक्टोबर 2024 रोजी

पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होतील, त्याच दिवशी हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या थेट हस्तांतरण

योजनांपैकी एक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना ही योजना सुरू केली होती.पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट हस्तांतरित केले जातात. जेणेकरून त्यांना महागड्ये बियाणे आणि खतांपासून

दिलासा मिळू शकेल. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!