माय महाराष्ट्र न्यूज:राज्यामध्ये सध्या महिला सुरक्षा आणि सबलीकरण हे मुद्दे चर्चेमध्ये आले आहेत. राज्य सरकारकडून एकीकडे महिलांसाठी लाडकी बहीण सारख्या योजना जाहीर केल्या जात आहेत.
तर दुसऱ्या बाजूला महिलांवरील अत्याचार देखील वाढले आहेत. यामध्ये अनेक प्रकरणं समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल अधिकची माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी शक्ती बॉक्स हा नवीन हेल्पलाईन सुरु केली आहे. यावरुन महिलांची सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाणार आहे.अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये शक्ती बॉक्स या योजनेबाबत माहिती दिली. या अभियानामध्ये युवकांचं प्रबोधन आणि महिलांची
सुरक्षा याबद्दल माहिती दिली जाणार आहे. मुलींचा होणारा पाठलाग, छेडछाड, आयडी लपवून फोन करणं या सगळ्या गोष्टी मुलींना सांगता येईल. खासगी कंपन्या, एस. टी. स्टँड, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन या आणि अशा सार्वजनिक ठिकाणी शक्ती बॉक्स ठेवण्यात
येतील. मुली, महिला यांच्याकडून ज्या तक्रारी येतील त्याची दखल घेतली जाईल. तसंच ज्या महिलेने, मुलीने तक्रार केली आहे त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन
उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी अजित पवार यांनी पोलिसांशी देखील चर्चा केली आहे. त्यामुळे शक्ती बॉक्स योजनेबाबत माहिती देताना अजित पवार यांनी सांगतिले की, पुणे, पिंपरी चिंचवडनंतर बारामतीचा नंबर लागतो. शहरातील कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं
आवश्यक आहे. नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. बारामतीकरांना वाटतं की कायदा सुव्यवस्था व्यवस्थित रहावं ज्यांना वाटतं त्यासाठीच हा बॉक्स ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शक्ती नंबरही आपण देणार आहोत. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं स्लोगन
आपण त्याला दिलं आहे. 920939497 हा तो नंबर आहे. यावर एक कॉल केला तर मुली, महिलांना होणारा त्रास सांगता येईल. हा क्रमांक 24/7 तत्त्वावर सुरु असेल. या क्रमांकावर फोन किंवा मेसेज केल्यास त्या तक्रारीचं निवारण करण्याबाबत आणि योग्य ती कारवाई
करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे आणि संबंधित महिला किंवा मुलींची नावं गोपनीय ठेवण्यात येतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.