पानेगांव (नेवासा)
नगर जिल्ह्यात जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या पानेगांव येथील स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान,रेणुका माता देवस्थान तसेच जय भवानी मित्र मंडळ वतीने या वर्षी हि नवरात्र उत्सवात ज्योत प्रज्वलित करण्यासाठी महालक्ष्मी देवस्थान वतीने मोहटादेवी येथून रेणुकामाता देवस्थानच्या वतीने नांदेड माहूरगड येथून जय भवानी मंडळाने कोल्हापूर येथून ज्योत आणली आठवडाभराच्या पायी ज्योत मध्ये युवक युवती बरोबरचं महिला पुरुषांनी सहभाग घेतला नवरात्र पहिल्या दिवशी गावा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका समोर छत्रपतींचा आरतीने फटाक्यांच्या आताषबाजीने स्वागत करण्यात आले.
पानेगांवचे उपसरपंच दत्तात्रय पाटील घोलप, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, सागर आंबेकर,मनोज आंबेकर,तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जंगले, शिवशक्ती सहकार पॅनलचे अध्यक्ष सुरज जंगले, सुभाष गुडधे डॉ काकडे आदींनी स्वागत करुन गावात मिरवणूकीला सुरुवात झाली पारंपारिक वाद्य संगीत लक्ष वेधून घेत होते. गावात गल्लोगल्ली,वाड्या वस्त्या वर सडा रांगोळी काढून सुवासिनींनी ज्योत पुजन करुन ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले यावेळी परीसरातुन मोठी गर्दी झाली होती.
दहा दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.
हभप दिपक महाराज उगले, महालक्ष्मी देवस्थानचे हभप रमेश महाराज जंगले, रेणुकामाता देवस्थानचे अशोकराव जंगले, बाबाराजे जंगलेजय भवानी मंडळाचे दादासाहेब तनपुरे,सुखदेव कल्हापुरे, संकेत गुडधे, चंद्रकांत जंगले शुभम जंगले भिकाजी जंगले, शिवाजी सोनवणे, दत्तात्रय कल्हापुरे, सुर्यकांत टेमक,भारत जंगले,आण्णासाहेब जाधव,अरुण शेंडगे बाबासाहेब शेंडगे,गणेश जंगले, ज्ञानेश्वर जंगले,अमित जंगले लक्ष्मण गागरे सुनिल जंगले,वैभव ठोसर, जालिंदर जंगले,विशाल जंगले, राहुल जंगले, पप्पू जंगले संदिप जंगले, लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे विठ्ठल गुडधे, संकेत जंगले तुषांत गुडधे, सचिन सोनवणे, विठ्ठल गागरे, शंकरराव जंगले दिपक जंगले, नितीन जंगले, आदींसह मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त उपस्थित होते.