शेवगाव
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अमरापुर येथे नव्याने सूरु केलेल्या शेतकी कार्यालयाचे (गट ऑफिस) उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
सभासद,उस उत्पादक शेतकरी यांना उस नोंद देणे, उस तोडणी संपर्क करणे सोईचे व्हावे या करिता अमरापुर या ठिकाणी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना उसाचे नवीन गट कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
कारखान्याचे संचालक ब काकासाहेब नरवडे पाटील, संजय कोळगे, बाळासाहेब ताठे,पंडितराव भोसले, बबनराव भुसारी, सखाराम लवाळे, निवृत्ती दातीर,कारखाना सचिव रविंद्र मोटे, मुख्य शेतकी अधिकारी सुरेशराव आहेर, डॉ. सुधाकर लांडे, अंबादास कळमकर,दीपक नन्नवरे,वृद्धेश्वर कंठाळी, उदागे मामा,राजेंद्र देशमुख, हनुमान पातकळ,संतोष पावसे,भोरु म्हस्के, विजयराव पोटफोडे,सुनील काजळे अमोल ताठे,विकास आमटे निलेश ताठे दादा हाडके, एकनाथ नांगरे,लहू हाडके, बंडू बर्डे अशोक बर्डे नवनाथ पवार शंकरराव उदागे मोठ्या संख्येने शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.