Tuesday, April 22, 2025

चैतन्य महाराज वाडेकरांना का केली होती अटक? बदनाम करण्याचा कट असल्याचा केला आरोप

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यातील लोकप्रिय किर्तनकार चैतन्य महाराज यांना अटक करण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे किर्तनकारांना अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. यानंतर आता

चैतन्य महाराज यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “आमच्या भांबोली गाव (ता. खेड, जि. पुणे) येथे वडिलोपार्जित जागेतील काही हिस्सा बांधकाम व्यावसायिकाला विकला आहे. परंतु त्याने अनधिकृतपणे आमच्या

जागेत यंत्रणेला हाताशी धरून चुकीच्या मोजणीद्वारे बेकायदेशीरपणे ताबा टाकून तेथे बांधकाम केले. ते बांधकाम पाडण्याचे आदेश भूमी अभिलेख विभाग व न्यायालयाने दिले असतानाही ते न पाडता उलट आमच्या कुटुंबियांवर बिल्डरने दडपशाही केली.

माझा अपंग भाऊ ऍड. अमोल वाडेकर यांना शारीरिक व्यंगावरून अपमानकारक वागणूक दिली. तसेच आमच्या जागेतील त्यांचे अतिक्रमण काढले असताना आमच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मी प्रसिद्ध कीर्तनकार असल्याने मला बदनाम करण्याचा हा संबंधित बिल्डरचा कट आहे,

असा आरोप प्रसिद्ध कीर्तनकार, चैतन्य महाराज वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह यांचे दोन भाऊ अॅड. अमोल आणि प्रमोद वाडेकर व नातेवाईक यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केल्याच्या वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चैतन्य वाडेकर यांनी

त्यांची बाजू पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांची बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी पीएमआरडीए च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बिल्डरला पाठिंबा असून संबंधीत बिल्डरकडून त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका कंपनीचा रस्ता उकरल्यामुळे अटक झाल्याच्या

अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र, यातून संबंधित बिल्डरकडून माझे नाव खराब करण्याचा हेतूने असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.वस्तुस्थिती बाबत अधिक माहिती देताना चैतन्य वाडेकर म्हणाले की त्यांचे भांबोली येथे

सर्व्हे नंबर ५६ आणि गट नंबर २४५ मध्ये वडिलोपार्जित शेत जमीन आहे. या क्षेत्रापैकी २ हेक्टर क्षेत्र विक्री करताना माझे कुटुंबाने केवळ २२० फूट फ्रंट असलेले उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र विक्री केले होते परंतु सदर बांधकाम व्यावसायिकाने त्यापेक्षा अधिक जागेवर

बेकायदेशीरपणे ताबा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सव्र्व्हे नंबर ५६ पैकी ७९ आर क्षेत्राची खरेदी आमच्या आजोबांच्या नावे असून त्याची मालकी व ताबा आमच्या कुटुंबाकडे होता आणि आहे. परंतु सदर क्षेत्राची नोंद भूमि अभिलेखात आमचे नावे न झाल्यामुळे आमच्या कुटुंबाने

मा. जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, पुणे यांचेकडे २००७ साली सदर रेकॉर्ड दुरुस्तीसाठी अपील दाखल केले होते. सदर प्रकरणी आमचे अपील मान्य करून मा. जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, पुणे यांनी सदर प्रकरणी दुरुस्तीचे आदेश दिलेले आहेत.

तसेच या क्षेत्रावर बिल्डरने विकसन परवानगी मिळवताना करण्यात आलेल्या मोजण्या करताना आम्हाला सहधारक असून देखील कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी सूचना दिली नाही. संबंधित यंत्रणे कडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून परस्पर चुकीच्या मोजण्या

करून आमच्या जागेवर अतिक्रमण केले. परिणामी संबंधित व्यवसायिकांनी माझे मोठे भाऊ अॅड. अमोल वाडेकर हे शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याचा गैरफायदा घेत आमच्या मालकीच्या आणि ताबेवहिवाटीच्या जागेत दांडगाईने अतिक्रमण करत बांधकाम चालू केले असून त्याविषयी आम्ही वेळोवेळी

पोलिसांकडे लेखी तक्रारी करून देखील आम्हाला दाद दिली गेली नाही. त्यानंतर आम्ही मा. महानगर आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे (पीएमआरडीए) यांचेकडे सदर बांधकाम चालू झाल्यानंतर त्वरित लेखी तक्रार दाखल केली होती, असे म्हटले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!