नेवासा
राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ,”मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियान टप्पा दोन स्पर्धा संपूर्ण राज्यभरातील शाळा व सर्व व्यवस्थापनाच्या शाळातून राबविण्यात आले. सदर अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुपे वस्ती तरवडी शाळेने सहभाग घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या अभियानात शाळेतील पायाभूत सुविधा, शैक्षणिक ध्येय- धोरणे अंमलबजावणी व शैक्षणिक गुणवत्ता यांची पडताळणी परिक्षण समितीकडून करण्यात आली होती. शाळेतील शैक्षणिक पूरक वातावरण, वृक्षारोपण संगोपन, रेन वॉटर हार्वेस्टिंग क्रीडांगणाची उपलब्धता वापर, परसबाग, व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण ओळख, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील यश, विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता व शालेय अभिलेखे, शाळा राबवत असलेले विविध उपक्रम पाहून समितीने समाधान व्यक्त केले होते .
तालुकास्तरीय गुणांकनात तुपे वस्ती शाळेने सर्वात जास्त गुणांकन घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार असून त्याचे उपयोग शालेय विकासासाठी करण्यात येणार आहे.
“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा”उपक्रमाच्या शाळेच्या स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामभाऊ गवळी, शिक्षक श्री. वसंत तांबे भारत कोठुळे, श्रीमती रंजना दळे मॅडम, शालेय पोषण आहार स्वयंपाकी इंताज सय्यद व मदतनीस चांदभाई सय्यद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल तुपे, उपाध्यक्ष दत्तात्रय कन्हेरकर व सर्व सदस्य, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गणेश बाळदेव दरवडे व सर्व सदस्य, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा निगार लतीब सय्यद व सर्व सदस्या, सरपंच सौ.स्वप्नाली राधाकिसन क्षिरसागर, उपसरपंचसौ.रेखा बाबासाहेब घुले, माजी सरपंच जालिंदर तुपे व ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी अध्यक्ष शा व्य.समिती ,सर्व विद्यार्थी, पालक व समस्त ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले.
*ग्रामस्थांकडून शाळेतील शिक्षकांचा सन्मान….*
शाळा व्यवस्थापन समिती तुपे वस्ती व ग्रामपंचायत तरवडी यांच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा यथोचित नागरी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जालिंदर नाना तुपे हे होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल तुपे, उपाध्यक्ष दत्तात्रय कन्हेरकर सर्व सदस्यांच्या वतीने तर ग्रामपंचायतच्या वतीने विद्यमान सरपंच सौ स्वप्नाली राधाकिसन शिरसागर, जनाभाऊ क्षीरसागर, दत्तात्रय भारस्कर यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि शा.पो.आ.स्वयंपाकी व मदतनीस सन्मान करण्यात आला.
तसेच राजमुद्रा तरुण मंडळ व ग्रामपंचायत बाभुळखेडे येथे आयोजित तालुकास्तरीय खुल्या दांडिया स्पर्धेत तुपेवस्ती शाळेने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल दांडिया ग्रुप मुलींचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयची व तुपे वस्ती शाळेची माजी विद्यार्थिनी साक्षी रावसाहेब बोराटे हिची लांब उडी स्पर्धेसाठी विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल साक्षी व तिचे वडील रावसाहेब लक्ष्मण बोराटे यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सोहम महेंद्र नाईक यानेही गणेशोत्सव खुल्या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल श्री. महेंद्र किसन नाईक यांचाही शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच ऋषिकेश सुनील इंगळे याची महाराष्ट्र पोलीस दलात पुणे येथे निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक रामभाऊ गवळी यांचा मुलगा श्रेयस रामभाऊ गवळी कंप्यूटर इंजिनियर याची मुंबई येथे ए. के. कॅपिटल सर्विसेस लिमिटेड कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
यावेळी नवरात्र उत्सव निमित्त शाळेतील मुलींनी दांडिया नृत्य सादर केले. उपस्थितांनी बक्षीस देऊन टाळ्यांची दाद दिली.या कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने पुरुष व स्त्रिया उपस्थित होत्या . त्यामध्ये सर्वश्री बाळदेव दरवडे, सुखदेव तुपे जनार्दन नाईक, महादेव तुपे, किशोर कनेरकर, रामदास घुले, संतोष दरवडे, हरिराम तुपे,भगवान घुले, महेंद्र नाईक, अहमदभाई शेख, कंकरभाई सय्यद, लतीब सय्यद, अशपाक सय्यद, सोमनाथ गवळी अमोल काळे सचिन वडगे महेश कुर्हे, आत्माराम दरवडे, अक्षय दरवडे, महेश क्षिरसागर, प्रशांत क्षिरसागर इत्यादी तर महिलांमध्ये वैशाली लांडगे मॅडम, कावेरी दरवडे, वर्षा घुले, स्वप्नाली कन्हेरकर, सुनिता तुपे, शितल वडगे, अनिता कन्हेरकर, वर्षा दुर्गेष्ट, जायदा शेख, निलोफर सय्यद इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन नियोजन शाळेच्या वतीने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत श्री.वसंत तांबे सर, प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.रामभाऊ गवळी व आभार श्री.भारत कोठुळे सर यांनी मानले. कार्यक्रम सजावट, सुशोभन व रांगोळी रेखाटन श्रीमती रंजना दळे मॅडम व शाळेतील मुलींनी केले.
शाळेचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी सन्माननीय श्री शिवाजीराव कराड साहेब, विस्तार अधिकारी श्रीमती रुकसाना शेख मॅडम, केंद्रप्रमुख कमल लाटे मॅडम, पंचायत समिती सर्व साधन व्यक्ती, गट समन्वयक, केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व बंधू-भगिनी तसेच मित्र परिवार यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.
शाळेच्या यशाबद्दल मा. आमदार पांडुरंग अभंग साहेब, माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब, सौ. जयाताई गडाख माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, सर्व पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ तुपे वस्ती, तरवडी, पत्रकार मित्र सोमनाथ कचरे, नामदेव शिंदे, सुखदेव फुलारी आदींनी शाळेचे अभिनंदन केले आहे.