माय महाराष्ट्र न्यूज:पुढच्या चार ते पाच दिवसात काँग्रेसचे चार आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे. रविवारी अमरावतीच्या
काँग्रेस आमदार सुलभा खोडके अमरावतीत एका मेळाव्यात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे मिटकरी म्हणाले. आज राष्ट्रवादीतील इनकमिंगची सुरूवात सिने अभिनेते सयाजी शिंदेपासून सुरू झाल्याचं मिटकरी म्हणाले.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशापासून सुरुवात झाली आहे.. लवकरच अमरावती काँग्रेस आमदार सुलभाताई खोडके यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यापुढेही काँग्रेसचे तीन आमदार लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत.
सर्वांची नावं माहिती आहेत, पण सध्या घेणार नाही असे मिटकरी म्हणाले. तुतारी गटात बंपर पक्षप्रवेश सुरू आहे याबाबत बोलताना मिटकरी म्हणाले की, त्यातले लोक कंटाळलेत. ते सुद्धा पुढं अजितदादांचं नेतृत्व करताना दिसले तर नवल वाटून घेऊ नका
असे मिटकरी म्हणाले. अजितदादांवर विश्वास ठेवून अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे.दरम्यान नितेश राणे या व्यक्तीबद्दल बोलावं वाटत नाही. प्रत्येक तरुण सुशिक्षित झालाय, अशा बावळट लोकांच्या नादाला लागणार
नाही असे अमोल मिटकरी म्हणाले. नितेश राणेंचे वक्तव्य कोणीही लोकशाहीमध्ये खपवून घेणार नाही. त्यांना आवरलं नाही तर त्यांच्याच पक्षांना नुकसान भोगावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या तोंडाला पट्टा लावावा असेही मिटकरी म्हणाले.
अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीय दंगल भडकवण्याचं पाप नितेश राणेंनी करू नये, असा सल्ला मिटकरींनी दिला.