माय महाराष्ट्र न्यूज:आगामी विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच आता मंत्री उदय सामंत यांनी येत्या 72 तासांत आचारसंहिता लागेल, असं विधान
केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.राज्यात विधानसभा निवडणुकांचं बीगुल लवकरच वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सगळ्या
पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू झालेली असतानाच आता मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेबद्दल मोठं विधान केलं आहे. येत्या 72 तासांत राज्यात आचारसंहिता लागेल. 72 तासांच्यानंतर सगळचं जनतेच्या हातात जाणार आहे.
असं त्यांनी म्हंटलं आहे. शिर्डीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या सुतोवाचनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सरू झाली आहे. काही पक्षांतला जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्व पक्षांकडून चाचपणी करण्यात येत आहे.
त्यातच आता आचारसंहितेच्या उदय समंतच्या वक्तव्याने चर्चा रंगली आहे.दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक
कधी लागतेय याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण आचारसंहिता कधीपासून लागू होईल याची तारीख समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यानं याबाबत माहिती दिली आहे.
त्यानुसार १३ किंवा १४ तारखेला आचारसंहिता लागू शकते असं या नेत्यानं म्हटलं आहे.