नेवासा
नेवासा तालुक्यातील गळनिंब गावात प्रगतशील शेतकरी परसराम खर्जुले यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यात योग्य उत्तम गुणवत्ता असलेले टोमॅटोची उत्पादन घेतले आहे.
या बाबद अधिक माहिती देतांना कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी सांगितले की,श्री. कर्जुले यांनी सुरुवाती पासून उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला. शेतीमध्ये चांगली पूर्व मशागत केल्यानंतर पॉलिथिन पेपरचा वापर करून आर्यामान या नवीन टोमॅटोच्या जातीची रोपे उपलब्ध करून त्यांची लागवड केली. पाण्याच्या नियंत्रणासाठी ठिबक सिंचनचा वापर केला व पाण्यात विद्राव्य असलेली रासायनिक खते दिली. एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये सेंद्रिय खते, जिवाणू खते व रासायनिक खतांचा समतोल वापर केला. त्यांनी मागील अनुभवावरून व आजची येणारे उत्पादन यावरून सांगितले की, मला एकरी १० लाख रुपये नफा निश्चित होईल. टोमॅटोचा ही जात स्टोरेज मध्ये जाड कातडी असल्यामुळे टिकाऊ आहे तसेच फळांमध्ये बी मर्यादित असून चव मधुर व रंग लाल भडक आकर्षक आहे.
या शेताला सलाबतपुरचे मंडल कृषी अधिकारी लक्ष्मण सुडके, कृषी पर्यवेक्षक प्रशांत पाटील व डॉ. अशोकराव ढगे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व भेट दिली. प्रगतशील शेतकरी कर्जुले यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस टोमॅटो उत्पादन घेतले आहे आणि त्याला उत्तम विक्री व्यवस्थापनाची व निर्यातीची जोड दिल्यामुळे चांगला नफा झाला आहे.