माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात होऊ घातलेले विधानसभा निवडणुकींचे बिगूल अखेर वाजले आहे. टया अनुषंगाने आता राजकीय घडामोडींना आता वेग आले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
असा सामना रंगणार असून अनेक इच्छुकांची नावे दररोज समोर येत आहे. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित पारनेर विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे.
पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मुंबईत पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सुजित झावरे, माजी बांधकाम सभापती श्री. काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, धनगर समाजाचे
नेते शिवाजीराव गुजर यांनी आपल्या समर्थकांसह जाहीरपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला पक्षप्रवेशामुळे बळ मिळाले आहे. माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह बड्या
नेत्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच पारनेर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे,
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती काशिनाथ दाते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांचा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. परिणामी, या नेत्यांच्या प्रवेशाने पारनेर तालुक्याचे राजकारण बदलणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवारांसह खासदार निलेश लंके यांना हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.