माय महाराष्ट्र न्यूज:राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस दिला जाणार असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3 हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे.
तसेच आणखी काही निवडक महिला आणि मुलींना 2500 रुपये दिले जाणार आहेत. याचाच अर्थ अनेक महिलांना दिवाळीच्या आधी 5500 रुपयांचा बोनस दिला जाणार असल्याची चर्चा आहे. असं असताना आता केंद्रातून मोठी बातमी समोर आली आहे.
केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दिवळी गिफ्ट देण्यासारखा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अनेक पिकांचा एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाने देशभरातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच
आणखी एक मोठा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गहू पिकाच्या भावात प्रति क्विंटल
150 रुपये, तर मोहरी पिकाच्या दरात 300 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच
आणखी एक मोठा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गहू पिकाच्या
भावात प्रति क्विंटल 150 रुपये, तर मोहरी पिकाच्या दरात 300 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.