माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात दि. १९ आणि २० ऑक्टोबर रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची
शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ”ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे तसेच दि. २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या
ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ”येलो अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे.
पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये.
पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.