माय महाराष्ट्र न्यूज:मुंबई शनिवारी रात्री काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने ‘ऑक्टोबर हीट’ने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका पुन्हा वाढू लागला आहे.
पावसाला पोषक हवामान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.हवामान खात्याने आज काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. धुळे, नाशिक,
अहिल्यानगर जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर, राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची
स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुंबईसह कोकणात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून सायंकाळाच्या वेळी मुंबई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांमुळे तयार
झालेले कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. हे वादळी चक्र किनाऱ्यापासून दूर जात आहे. उत्तर तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य अंदमान समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, या परिसरावर सोमवारपर्यंत कमी दाबाचे
क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.माणिकारव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 19 ऑक्टोबरपासून पुढील दोन दिवस म्हणजे 19 ते 20 ऑक्टोबर (शनिवार- रविवार) दरम्यान खान्देश (धुळे, नंदूरबार आणि जळगाव) नाशिक, नगर ,पुणे ,
सातारा ,सांगली ,कोल्हापूर ,सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात गारपीटीची शक्यता कशामुळे निर्माण झाली?
i) रत्नागिरी जिल्ह्याच्या समोर खोल अरबी समुद्रात व थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर बं. उपसागरातील दोन्हीही समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीतून सह्याद्रीच्या पूर्व बाजूला संपूर्ण मध्य महाराष्ट्रादरम्यान होणारा वाऱ्यांचा संयोग.
ii) मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून 5.8 किमी. उंचावर तयार झालेला ‘ व्हर्टिकल विंड शिअर ‘ (एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या असमान वेगवान वाऱ्याचा व्हर्टिकल शिअर झोन)
iii) मध्य तपांबरात म्हणजे समुद्र सपाटीपासून 5.8 किमी. उंचावर, उत्तर दिशेकडून 20 डिग्री अक्षवृत्त दक्षिणे पर्यंत पर्यन्त सरकलेले बळकट पश्चिमी वारे ह्या वातावरणीय घडामोडीमुळे गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे.