Thursday, February 12, 2026

विक्रीकर निरीक्षक पुजा शिंदेचे एमपीएससी मुख्य परीक्षेत नेत्रदिपक यश

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल ३० ऑक्टोबर रोजी जाहीर झाला असून नेवासा तालुक्यातील भेंडा येथील कु. पुजा शिवाजी शिंदे (विक्री कर निरीक्षक) ही ५६७.७५ गुण मिळवून राज्यात २०८ क्रमांक पटकावुन उत्तीर्ण झाली असून तीला पोलीस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी, औद्योगिक उपसंचालक, विक्री कर सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्तीची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा आयोगा (एमपीएससी) कडून २७ ते २९ मे या कालावधीत राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या १५१६ उमेदवारांची वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या. राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२४ – सर्वसाधारण गुणवत्ता यादी ३० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात पुजा शिंदे २०८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी, औद्योगिक उपसंचालक, विक्री कर सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्तीची संधी तीला मिळणार आहे.

कु.पुजा ही नेवासा बाजार समितीचे माजी सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे व भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ.वैशाली शिंदे यांची कन्या असून तीचे  माध्यमिक शिक्षण भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता विद्यालय झाले, बीएस्सी व एम.एस्सी जिजामाता शास्र व कला महाविद्यालय येथे झाले.  एम.एस्सीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम  क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने तीला विद्यापीठाकडून
डॉ.टी.एस महाबले ‘सुवर्ण पदक’ ही मिळालेले. स्पर्धा परीक्षेची तयारी घरूनच केली होती. सन २०२४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत ही ती उत्तीर्ण होऊन सध्या ती विक्री कर निरीक्षक या पदावर कार्यरत आहे.
तिच्या या यशाबद्दल तीचे सर्वस्तरातून  अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!