Thursday, July 10, 2025

खासदार नगरला आपटला मात्र तो डोक्यावर आपटला:बाळासाहेब थोरातांकडून सुजय विखेंचा समाचार

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माजी खासदार सुजय विखे यांनी गेल्या काही दिवसांपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघात अनेक सभा घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात टीकेची झोड

उठवली आहे. बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा घेत विखे पिता पुत्रांवर टिका केली आहे.खासदार नगरला आपटला मात्र तो डोक्यावर आपटला हे आता कळालं अशा शब्दात

थोरातांनी सुजय विखे यांची खिल्ली उडवली आहे. तर इथे येऊन माझी टिंगल करताय, मी बाळासाहेब थोरात यांची मुलगी असून, संयम राखू शकते, मात्र वेळ प्रसंगी चांगली ठणकावू शकते, अशा शब्दात जयश्री थोरात यांनी सुजय विखे यांना खडे बोल सुनावले आहेत..

“शिर्डी मतदारसंघ गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आणि दहशतमुक्त करण्यासाठी कार्यक्रम सुरू करायचा आहे. इथे खूप दहशत आणि धाक आहे. गणेश कारखान्याच्या वेळेस दहशतीचे झाकण बरेचसे उघडले. लोकसभेला तर खूपच आऊट

झालं, थोडेफार राहिलं असेल तर ते या निवडणुकीत काढून टाकायचे. संगमनेरमध्ये येऊन कुणी काहीही भाषणं केली तरी काळजी करू नका. नगरमध्ये खासदार आपटला, पण आता कळालं तो डोक्यावर आपटला होता. आता कळालं असे भाषणं का व्हायला लागले.

डोक्यावर आपटल्यावर अशीच भाषणं होणार,” असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली.संगमनेरचे आमचे लोक समर्थ आहेत. जितका बोलाल तेवढं माझं लीड वाढेल. बोल तू, लीड वाढल्याशिवाय राहणार नाही. यांच्या

सभा म्हणजे गाड्या – घोड्या. नंतर काहीतरी खाटुक खुटुक असतं. लोक उचलायचे, न्यायचे, बसवायचे आणि फोटो काढायचा, आम्ही सगळा समाचार घेऊ, पुरा कार्यक्रम होईल, काळजी करू नका. शिर्डीत दहशतवाद विरोधात आंदोलन सुरु करा, दहशतवाद से आजादी “

हे आपलं या निवडणुकीत घोषावाक्य असलं पाहिजे. हे ज्या पक्षात जातात, त्याचा पदर जाळायचा कार्यक्रम करतात,” असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावला. दरम्यान संगमनेर तालुका हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला आहे. आम्हाला

गर्दी गोळा करण्यासाठी बसेस पाठवाव्या लागत नाहीत. इथल्या जनतेचे बाळासाहेब थोरात यांच्यावर नितांत प्रेम आहे. मात्र आता काळ वेगळा आहे. आपल्याला या बालेकिल्ल्याचे रक्षण करायचे आहे. बाहेरची ताकद आक्रमण करत आहे. जेव्हा ते बाळासाहेब

थोरात यांच्यावर बोलतात तेव्हा संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचते. ते मला म्हणतात “ताई ओ ताई”, कुणाची टिंगल करताय? मी बाळासाहेब थोरात यांची मुलगी, संयम राखू शकते, चांगली खनकावू पण शकते. बोलायचे असेल तर शिस्तीत बोला,” असा इशारा जयश्री थोरात यांनी दिला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!