नेवासा/सुखदेव फुलारी
२२१ नेवासा विधानसभा मतदारसंघात सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी पाचव्या दिवशी
विद्यमान आमदार शंकरराव गडाख व माजी आ.बाळासाहेब मुरकुटेंसह १३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले तर २८ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
सोमवार दि. २८ रोजी पाचव्या दिवशी नेवासा विधानसभा मतदारसंघाकरिता १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर १७ व्यक्तींनी २८ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.आजर्यंत एकूण ७६ व्यक्तींनी १४० उमेदवारी अर्ज नेले आहेत.
दि.२८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे:—
सुनिता शंकरराव गडाख (अपक्ष २ अर्ज), बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोदर मुरकुटे (भाजपा,शिवसेना, अपक्ष प्रत्येकी १ असे ३ अर्ज), शंकरराव यशवंतराव गडाख ( शिवसेना उबाठा ४ अर्ज), आशाबाई दादासाहेब मुरकुटे (अपक्ष १ अर्ज), संतोष नानासाहेब काळे (अपक्ष १अर्ज), कांबळे ज्ञानदेव लक्ष्मण (अपक्ष १ अर्ज),पोपट रामभाऊ सरोदे (वंचित बहुजन आघाडी १ अर्ज)
विद्यमान आमदार शंकराव गडाख यांनी शिवसेना (उबाठा) कडून आपली उमेदवारी दाखल केली तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भाजपा,शिवसेना, अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नी नेवासा पंचायत समिती माजी सभापती सुनीताबाई गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशाताई मुरकुटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दि.२८ रोजी उमेदवारी अर्ज खरेदी केलेल्या व्यक्तिची नावे:—
दत्तात्रय त्रिंबक काळे (भेंडा बुद्रुक) १ अर्ज, पंढरीनाथ रामराव फुलारी (भेंडा बुद्रुक) १ अर्ज, पोपट रामभाऊ सरोदे (तेलकुडगाव) यांच्याकरिता २ अर्ज, किशोर मुरलीधर मुरकुटे (सौंदळा) १ अर्ज, संभाजी कोंडीराम माळवदे (चांदगाव) १अर्ज, अनिल दिनकरराव ताके (नेवासा)१ अर्ज, राजेंद्र रत्नकर वाघमारे (हंडीनिमगाव) २ अर्ज,
संकेत राजेंद्र वाघमारे (हंडी निमगाव) २ अर्ज, किरण अर्जुन शिंदे (कुकाणा) २ अर्ज, किसनराव रामभाऊ गड़ाख (पानसवाडी) २ अर्ज, चित्रा किसनराव गड़ाख (२ अर्ज), ऋतुराज किसनराव गड़ाख (२ अर्ज) , यशराज किसनराव गड़ाख (१ अर्ज) , रविराज तुकाराम गड़ाख (पानसवाड़ी) १ अर्ज, अरुण कचरू मनाळ (वाहेगाव) ४ अर्ज, गणपत मच्छिंद्र मोरे (खडका)१ अर्ज, बापू पुंजाराम मोरे (देडगाव) १ अर्ज, बाबासाहेब सोपान शिंदे (सुरेगाव गंगा) १ अर्ज.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अरुण उंडे काम पहात आहेत.