नेवासा/सुखदेव फुलारी
221 नेवासा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच कडून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
नेवाशातून उमेदवारी मिळण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच चालू असतानाच रात्री उशिरा अचानकपणे विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे नेवासा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
नेवासा तालुक्यातील शिरजगाव येथील रहिवासी असलेले विठ्ठलराव लंघे हे भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष असून नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी 2004 मध्ये नरेंद्र घुले पाटील यांचे विरुद्ध तर 2009 मध्ये शंकरराव गडाख यांचे
विरुद्ध भाजपाचे तिकिटावर निवडणूक लढविली होती. दोन्ही वेळेस त्यांना थोड्या मताने पराभव पत्करावा लागला होता. 2009 मध्ये शंकरराव गडाख नेवास स्वतंत्र नेवासा मतदार संघाचे आमदार झाल्यानंतर लंघे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात आले होते. परंतु जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून जिल्ह्यामध्ये परिचित आहेत.
नेवासा विधानसभा मतदार संघांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आ.शंकरराव गड़ाख यांच्याविरुद्ध प्रबळ उमेदवारीचे दावेदार म्हणून शिवसेनेकडून उद्योजक प्रभाकर शिंदे तर भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,
विठ्ठलराव लंघे व इतर भाजपचे कार्यकर्ते उत्सुक होते. लंघे,मुरकुटे व शिंदे यांच्या तिकीटा करिता प्रचंड रस्सिखेच सूरु होती. त्याकरिता सर्वजण मुंबईमध्ये ठाण मांडून होते.
सोमवार दि. 28 रोजी माजी आमदार मुरकुटे यांनी भाजप शिवसेना व अपक्ष असे तीन उमेदवारी अर्ज भरलेले होते. मात्र शिंदे व लंघे हे कोणतेही घाई न करता एकनाथ शिंदे व भाजप नेत्यांचे निर्णयाची वाट पाहत थांबून होते. अखेर शेवटच्या क्षणी विठ्ठलराव
लंघे यांना शिवसेनेने तिकीट जाहीर केले आहे.आता लंघे यांना भाजपाला सोडचिठी देऊन शिवसेनेत प्रवेश करावा लागणार आहे.
मंगळवार दिनांक 29 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने विठ्ठल लंघे हे उद्या उमेदवार अर्ज दाखल करतील.