Thursday, November 7, 2024

नेवासा पोलीस ठाणे हद्दीत केंद्रीय राखीव पोलीस बल व पोलिसांचा संयुक्त रूट मार्च

नेवासा

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व दिपावली सण उत्सव अनुषंगाने तालुक्यातील कुकाणा शहर, भेंडा, नेवासा फाटा, नेवासा शहर या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात व शांततेत पार पाडणे दृष्टीने केंद्रीय राखीव पोलीस बल व जिल्हा पोलीस असा संयुक्त रूट मार्च घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

या रूट मार्च करीता केंद्रीय राखीव पोलीस बलाचे पोलीस निरीक्षक तिजारे यांचे 35 जवान, पोलीस ठाणे नेवासा कडील 6 अधिकारी 25 अमलदार असे सहभागी झाले होते. सदर रूट मार्च सकाळी 09.30 वाजता सुरू होऊन 11.15 वाजता पार पडला आहे.
सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा ठरला. सदर रूट मार्चचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
सदरचा रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना व विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगारांवर नियंत्रण राहावे हा होता.
सदरचा रूट मार्च पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबर्मे व उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!