Thursday, December 26, 2024

विधान परिषदेकरिता अब्दुल शेख यांच्या नावाची चर्चा

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

विधान परिषदेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांच्या नावाची चर्चा असून त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यास नेवासा तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी मिळणार आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी वय असणारे अब्दुल शेख यांना अजीत पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महायुतीची अधिकृत उमेदवारी असतांना देखिल त्यांनी समजदारीची भुमिका घेत आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या साठी उमेवदरी अर्ज माघे घेतला व प्रामानिकपणे महायुती धर्म पाळला आणि महायुतीचा प्रचार केला. निवडणुक प्रचारा दरम्यान कुणावर टीका टिपण्णी न करता व्हिजन व विकासावर बोलणारा नेता म्हनुन ओळख मिळवली. दुसऱ्याची न खोडता आपली रेष कशी मोठी होईल यावर लक्ष केंद्रित केले. ओबीसी समाज,अल्पसंखयाक समाज शेख यांच्या पाठीशी उभा राहिला. तसेच तालुक्यात लाडकी बहिन योजना, अजीतदादा आरोग्य योजना,बचत गटाचे सक्षमीकरण अतिशय अचूक पद्धतीने केल्याने अब्दुल शेख यांचा महायुतीला चांगलाच फ़ायदा नीवडनुक निकालात दिसुन आला. त्यामुळे शेख यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शेख यांना विधानसभेवर बसंधी मिळनार आसल्याचे बोलले जात आहे. शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा चालु आसुन अब्दुल शेख यांची विधानसभा निवडणुकित महत्वाची भुमिका बजावलेली असुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यंमंत्री अजीत पवार यांच्या जवळचे विश्वासु असणारे शेख यांची विधान परिषद सदस्य किंवा महामंडळासाठी वर्णी लागणार आसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे नेवासा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे उत्साह निर्माण झाला असुन शेख यांच्या नेतृत्वात कमी वेळेत राष्ट्रवादीने तालुक्यात आपली ताकद निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांचा शेख यांना जिल्हा परिषद निवडणुक लढविण्याचा देखिल आग्रह होत आहे. शेख यांना मुंबई येथे बोलाऊन घेतल्याचे समजत आहे. सर्व समावेशक चेहरा असणारे शेख यांचे महिलांसाठी मोठे कार्य आहे. त्यांच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसुन आलेली आहे. आता अब्दुल शेख़ हे राज्याचे राजकारणात जातात की जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून समोर येतात या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

*तर पक्ष संघटन अधिक मजबुत होईल…

अब्दुल भैय्या शेख यांचा महायुतीसाठी मोठा त्याग असुन त्यांनी सर्व समाजाला घेऊन वाटचाल केली आहे.त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अतिशय चांगले काम करत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुक्यात चांगले यश संपादित करेल. आशा युवा नेत्याला पक्षाने संधी दिली तर पक्ष संघटन अधिक मजबुत होईल.
-अशोक मोरे, तालुक़ाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

*नेता नव्हे मित्र…
सर्वाना हवा हवासे वाटनारे भैय्या आम्हा युवकांना कुटुंबातिल सहकारी आसल्यासारखी वागनुक देतात सर्वाच्या अड़ी अड़चनी मधे ऊभे राहतात.म्हनुन आम्हाला ते नेता नाही तर मित्र वाटतात आशा सर्वसाधारन व्यक्तिला न्याय मिळाला पाहिजे.
-अभिराज आरगडे, तालुकाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!