Thursday, January 23, 2025

सरपंच संतोष देशमुख खून व कृष्णा शिंदे धमकी प्रकरणी नेवासा सरपंच संघटना आक्रमक

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खुनातील व नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगावचे सरपंच कृष्णा शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपिंना कडक शिक्षा करावी यामागणीचे निवेदन तहसीलदार नेवासा यांना देऊन दि. २ जानेवारी गुरुवार रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेऊन निषेध करणार असल्याचे लोकसेवक सरपंच संघटना तालुका अध्यक्ष सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हंटले आहे की, सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा गेल्या काही दशकातील महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्घृण खुन आहे. जल्लादांना ही पाझरफुटावा, राक्षसाचा ही आत्मा थरथर कापावा इतक्या पाशवीपणे सरपंचाला मारले गेले. सदर घटनेतील चार आरोपी पकडले गेलेले आहेत, परंतु मुख्य आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे. त्यास अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.

तसेच नेवासा तालुक्यातील बिलपिंपळगावचे सरपंच कृष्णा शिंदे यांना निनावी पोस्टाने संतोष देशमुख यांचे सारखे तुकडे करू अशी धमकी देण्यात आलेली आहे, याबाबत पोलीस प्रशासनाने संतोष देशमुख प्रमाणे गुन्हा दाखल करायला विलंब न करता तातडीने कारवाई करावी अन्यथा सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच सदर दोन्ही घटनेचा निषेध म्हणून गुरुवार दि.२ जानेवारी रोजी नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे काम बंद ठेवून निषेध करणार आहे.

तहसीलदार संजय बिरादार यांनी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे बाबद सांगितले.
निवेदनावर संघटना अध्यक्ष शरद आरगडे,
उपाध्यक्ष प्रमोद गजभार,आघाडी अध्यक्ष पुजाताई भिवाजी आघाव,मार्गदर्शक वडुलेचे सरपंच दिनकरराव गर्जे, चंद्रकांत मुंगसे, शांताबाई उभेदळ,वनमाला चावरे, भाऊसाहेब सावंत, ज्ञानेश्वर औताडे, सुनंदा दराडे आदी सरपंचांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!