भेंडा/नेवासा
पन्नास वर्षापासून एकच गुणगान गाणाऱ्यांची पारंपारिक दिशा सोडून युवकांनी प्रगतीच्या दिशेने, नवीन वाटचालीच्या दिशेने, नवीन नवीन उद्योग धंद्याच्या दिशेने आणि नवीन पॅटर्नच्या दिशेने जायचं की नाही हे ठरावावे लागेल. मला संधी दिल्यास समाजकारण राजकारणा बरोबरच मी युवकांना उद्योग धंद्याच्या दिशेने नेईल अशी ग्वाही देत सिद्धांत नवले याने जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीचे रणसिंग फुंकले.
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथे सिद्धांत नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजित नेवासा तालुक्यातील युवकांचा संवाद मेळाव्यात उद्योजक सिद्धांत नवले बोलत होते. रामकृष्ण नवले, रविंद्र नवले, पंढरीनाथ फुलारी, सुनील गव्हाणे, हिरामन साळवे, राजेंद्र चिंधे, नामदेव शिंदे, सुजित गोर्डे, सरपंच दत्तात्रय शिरसाठ,डॉ.लहानू मिसाळ,सुनील गव्हाणे,मंगेश नवले, पिंटू वाघडकर, ईश्वर गोत्राळ,अशोक साळवे,संतोष महापूर,सर्जेराव खरात, कृष्णा दरंदले,दत्तात्रय गडाख,शिवाजी शिरसाठ, शरद शिरसाठ, भगवान शेजुळ,चंदू गव्हाणे,भाऊसाहेब गदाई,राजेंद्र वाघडकर, संजय साळवे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.नवले पुढे म्हणाले की,मी कृषी पदवीधर आहे आणि वडील व आजोबांचा मला आग्रह होता की गुजरातमध्ये कंपनी घेतलेली आहे,मी गुजरात मध्ये राहून व्यवसाय केला पाहिजे.परंतु माझी नाळ ही व्यवसायाशी असली तरी तो व्यवसाय हा नेमका ग्रामीण भागातला आहे.त्यामुळे माझी नाळ ग्रामीण भागाशी जोडली गेलेली आहे.परिसरात फिरत असताना जाणवत गेलं की इथं मोठे मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला उत्तर पाहिजे.
व्यवसाय-समाजकारण करतांना अनेक प्रश्न लक्षात आले. ते प्रश्न सोडविन्यासाठी परिसरात सामाजिक दृष्टीने सक्रिय व्हायचं निर्णय घेतलेला आहे.
त्यात तुमच्या सगळ्यांचा मार्गदर्शन व सोबत सर्वांची साथ ही नक्कीच मला या ठिकाणी लागेल.युवक हा समाजाचा एक मोठा घटक झालेला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात बघितलं तर सर्वात जास्त आकडा हा युवकांचा आहे. मी पुढचे पाऊल उचलणार आहे ते देखील मी याच युवकांच्या भरोशावर आणि ताकतीवर उचलणार आहे. आज आपल्या ग्रामीण भागात बघितलं युवकांना नोकऱ्या नाहीये हाताला काम नाहीये घरी बसून फक्त फोन आणि इंस्टावर आहेत. कुठेतरी या गोष्टी बदलल्या पाहिजे या हेतूतून मी खऱ्या अर्थाने काम करायचं निर्णय घेतलेला आहे. परिसरात मोठे प्रोजेक्ट कसे येतील, मोठा रोजगार कोणतरी द्यायला पाहिजे.
सगळ्यांची साथ जर भेटली तर आपण निश्चितच मोठे काम करू.
पंढरीनाथ फुलारी, किशोर मिसाळ, दादा गजरे, सुनील गव्हाणे, राजेंद्र चिंधे,प्रवीण खरात, अजित गोर्डे,दिवाकर वाघडकर, पोपट हजारे, सुरेश धनवडे, रोहित रुईकर, नामदेव शिंदे,आदेश जावळे यांनी मनोगत व्यक्त करून सिद्धांत नवले यांनी निवडणुक रिंगणात उतरावे असा आग्रह धरला.
हरिभाऊ नवले यांनी प्रस्ताविक केले. गणेश महाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.