Tuesday, February 4, 2025

विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे-माजी आ.नरेंद्र घुले पाटील

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

प्रत्येकाने आयुष्यातील प्रत्येक क्षण मनापासून जगावा. स्वतःतील गुणांचा अधिक विकास करीत  आयुष्य यशस्वी करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करून जीवनाची स्पर्धा  जिंकावी. त्यासाठी आवश्यक असे अद्ययावत  आणि कौशल्यपूर्ण शिक्षण महाविद्यालयातून मिळाले पाहिजे असे प्रतिपादन श्री. मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाने आयोजित केलेल्या सहविचार सभेत अध्यक्षस्थानावरून श्री.घुले बोलत होते.
शिक्षण संस्थेचे विश्वस्त माजी आ. पांडुरंग अभंग, ॲड. देसाई देशमुख, काकासाहेब शिंदे,काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, डॉ.नारायण म्हस्के, सहसचिव रवींद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.घुले यांनी जिजामाता महाविद्यालयातील सर्व विभागांना  भेटी देऊन कामकाजाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.  प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल, डॉ.संभाजी काळे, शाखा प्रमुख डॉ.काकासाहेब लांडे, केशव चेके, प्राचार्य डॉ कोलते, प्रा विजय काशीद, बंडू घोडेचोर आदी यावेळी उपस्थित होते. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!