नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ३६६ विद्यार्थ्यांनी सहलीसह रेनडान्सचा आंनद घेतला आहे.
शुक्रवार दि.३१ जानेवारी रोजी पीएमश्री भेंडा फॅक्टरी जिल्हापरिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल श्रीक्षेत्र पैठण तसेच खटोड फार्म कारकीन या ठिकाणी नेण्यात आली होती. सदर सहलीला शाळेतील ३६६ विद्यार्थी १४ शिक्षक सहभागी झाले होते. याकरिता एसटी महामंडळाच्या ६ बसेस लावण्यात आल्या होत्या. दि.३१ रोजी सकाळी ६ वाजता शाळेच्या प्रांगणातून बसेस सहलीसाठी रवाना झाल्या. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी मिनरल वॉटरच्या बाटल्या, प्रथमोपचार साहित्य,अत्यावश्यक औषधं, कॅरीबॅग, मुलांना रेनडान्सचा अनुभव देण्यासाठी एक-एक अतिरिक्त पोशाख व टॉवेल सोबत घेण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, विस्तार अधिकारी श्रीमती रुकसाना शेख, केंद्रप्रमुख सुखदेव सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप फुलारी, कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक संजय कडूस, शिक्षक पावलस गोर्डे, संजय थोरात, सतिष चाबुकस्वार, कानिफनाथ दौंड, दत्तात्रय नवगिरे,महेंद्र वडींकर, सुरेश तळेकर,शिक्षिका मंदाकिनी पवार,सुनिता माळशिखरे, ताई गायकवाड, सुरेखा मंडलीक, विमल देवकर, निलेशा घुणे यांनी सहल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.