Tuesday, July 21, 2026

जिजामाता पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चैतन्य टेकणे यांना ॲमेझॉन कडून ८८ लाखाचे पॅकेज

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री. मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी चैतन्य टेकणे यांची कॅनडा येथे ॲमेझॉन या विदेशी कंपनी मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाली असून कंपनीने त्याला वार्षिक ८८ लाख रुपयांचे पॅकेज दिले आहे.

त्याच्या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी त्याचा सन्मान केला. याप्रसंगी काकासाहेब नरवडे, प्रा.भारत वाबळे, संतोष टेकणे,
जिजामाता पब्लिक स्कुलचे प्राचार्य
प्रा.डॉ .राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दीपक राऊत,बापूसाहेब टेकणे यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतलेली गगन भरारी निश्चितच प्रेरणादायी असेल. चैतन्य ची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपली पावले यशाच्या दिशेने उचलावे असे प्रतिपादन माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, विश्वस्त माजी आ. पांडुरंग अभंग, ॲड देसाई देशमुख,डॉ. क्षितीज घुले पाटील,सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे, शिक्षक वृंद व पालक यांनी चैतन्यचे कौतुक केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!