Sunday, November 16, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे पालकमंत्र्यांहस्ते उद्घाटन

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर, दि.१ मे २०२५

मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रूग्णालय मदत केंद्राचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांना लाभ देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा व उपचारांची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पकंज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूराव नागरगोजे, जिल्हा कक्ष अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. निळकंठ ठाकरे आदी उपस्थ‍ित होते.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान कार्ड, धर्मादाय रुग्णालय योजनांचा लाभ न मिळालेल्या गरजू रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून प्राधान्य लाभ देण्यात यावे. या योजनेची माहिती जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व रूग्णालयांमध्ये भितीपत्रकांच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावी.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत लाभ घेण्यास पात्र असलेल्या रुग्णांना संबंधित योजनेच्या जिल्हा समन्वयक यांचे माध्यमातून संलग्नित (Empanelled) रुग्णालयात प्रवेशित करण्याबाबत कळविण्यात येणार आहे. धर्मादाय रुग्णालयात प्रवेशित असलेल्या रुग्णांच्या बाबतीत, जिल्हा धर्मादाय उपायुक्त कार्यालयातून जिल्ह्यातील उपलब्ध धर्मादायाची संबंधित संस्थांची माहिती घेऊन त्यानुसार रुग्णास रुग्णालयात प्रवेशित करण्याबाबत व सवलतीच्या दराने अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याकरीता लेखी स्वरुपात कळविण्यात येणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) अंतर्गत, ० ते १८ वर्षे वयापर्यंतच्या रुग्णांकरिता योजनेतील विहित व्याधी, विकार अनुरूप मोफत उपचार केले जातात. पात्र रुग्णांना जिल्ह्यातील योजनेशी संलग्नित रुग्णालयांना संदर्भीत करण्यात येईल. या योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या अर्थात या योजनांच्या निकषांच्या कक्षेबाहेरील रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे वैद्यकीय उपचारार्थ अर्थसहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंतर्गत संलग्न रुग्णालयांची यादी व पात्रता निकषांकरिता cmrf.maharashtra.gov.inया संकेतस्थळांस भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कक्ष अधिकारी श्री.ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!