Thursday, May 14, 2026

डॉ.उपदेश मोटे डॉक्टरेट इन बिझिनेस मार्केटिंग पदवीने सन्मानित

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील डॉ.उपदेश मोटे यांना डॉक्टरेट इन बिझिनेस मार्केटिंग या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे विश्व  मानवाधिकार संस्था आणि एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, मणिपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात Doctorate in Business Marketing या मानद पदवीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात भारतातील २२ जणांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये मोटे यांचा समावेश आहे. डॉ.मोटे यांना विश्व मानवाधिकार संस्था व एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, मणिपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट इन बिझिनेस मार्केटिंग या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
या वेळी जीएसआरटी इंडियाचे अध्यक्ष डॉ.एच.आर. रेहमान, सीजेएम एस. एस. धपाटे, सिनेअभिनेत्री सीमा कुलकर्णी, डॉ. सोमनाथ जाधव, डॉ. विनायक सरवदे, फातिमा आदी उपस्थित होते. पदवीबद्दल मोटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!