Thursday, February 12, 2026

कुकडी प्रकल्पावरील पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची जगदंबा पाणी वापर संस्थेस भेट

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

कुकडी प्रकल्पावरील पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुळा प्रकल्पाच्या अंतिम भागातील नेवासा तालुक्यातील खडका सिंचन शाखे अंतगर्त कार्यरत असलेल्या जगदंबा पाणी वापर संस्थेस भेट देवून पाणी वापर संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली.

कुकडी प्रकल्पावरील पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जगदंबा पाणी वापर संस्थेस भेट देवून पाणी वापर संस्थेच्या कामकाजाची पाहणी करून चर्चा केली. पाणी वापर संस्थेच्या मुखातील पाणी मोजणीच्या साधनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
जगदंबा पाणी वापर संस्थेचे उपाध्यक्ष
भीमराज आढाव,सचिव शशिशेखर भोरे, तुळजाभवानी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष
मनोहर गोबाडे, ज्ञानेश्वर पाणी वापर संस्थेचे सचिव राजेंद्र सुसे,पाणी वापर संस्था सक्षमीकरण चळवळीचे कार्यकर्ते सुभाष झिंजाड, मुक्ताबाई पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष पाडुरंग डुकरे, जय बजरंग पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ येवले, खडका सिंचन शाखेचे कालवा निरीक्षक नवनाथ शिरसाट यांचेसह मीना प्रकल्पावरिल पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

संस्थेची माहिती देतांना शशिशेखर भोरे म्हणाले की, जगदंबा पाणी वापर संस्थेमार्फत प्रत्येक सभासदाला समन्यायी पद्धतीने पाण्याचे सुयोग्य नियोजन व मोजमाप करून समन्यायी पद्धतिने पाणी दिले जाते.त्यामुळे संस्थेची पाणीपट्टी वेळेत वसुल होते. पाटबंधारे विभागाला वेळेत पाणीपट्टी भरल्याने ५० टक्के परताव्यासह आगाउ पाणीपट्टी भरल्यास १० टक्के सुट संस्थेला मिळते. आज मीतीला संस्थेकडे 3 लाख रुपये निधी उपलब्ध असून बँकेमध्ये मुदत ठेव ही ठेवण्यात आलेली आहे असे सांगून अंतिम भागातील १३ पाणी वापर संस्थाची सद्य सिस्थीची माहिती दिली .

सुभाष झिंजाड म्हणाले, मंगळवार दि. ०६ मे रोजी मुळा प्रकल्पावरील जगदंबा पाणी वापर संस्था खडका या संस्थेला भेट देवून माहिती घेण्याचा योग आला. सध्या उन्हाळी हंगामाचे आवर्तन सुरू असून अंतिम भागात पूर्ण दाबाने म्हणजे जवळपास ३५ क्युसेक्सने पाणी सुरु असल्याचे पहावयास मिळाले.मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनाचा फायदा पाणी वापर संस्थाना होतांना दिसला. जलसंपदा विभागाचे सर्व कालवा निरिक्षक, बीटधारक यांचेही पाणी वापर संस्थांना सहकार्य होतांना दिसले .संस्थांना हक्काचा पाणी कोठा कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी उपलब्ध करून दिल्याने संस्थाचे पदाधिकारी समाधान व्यक्त करताना पहावयास मिळाले .

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!