Sunday, November 16, 2025

नजिक चिंचोली येथील पंचदिनी नामचिंतन पारायण सोहळयाला धर्मध्वजारोहणाने प्रारंभ

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली येथील धाडगे वस्तीवरील नामसाधना अध्यात्मिक साधक आश्रमामध्ये ब्रम्हलिन सच्चिदानंद संत रामदास बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने आयोजित पंचदिनी नामचिंतन पारायण सोहळयास धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ करण्यात आला.
    
सोमवार दि.५ मे ते शुक्रवार दि.९ मे या कालावधीत महादेव महाराज धाडगे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सोहळयाचे धर्मध्वजारोहण रविवार दि.४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जगदंबा खडेश्वरी देवी संस्थानचे प्रमुख महंत गणेशानंदजी महाराज, महादेव महाराज धाडगे, आत्माराम महाराज धाडगे, अशोक महाराज चौघुले यांच्या हस्ते व भक्त परिवारातील सदस्य,  ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले
     
पाच दिवस चालणाऱ्या या सोहळयात पहाटे ४ ते ५ नामचिंतन,५ ते ७ काकडा आरती,सकाळी ७ ते ८ ज्ञानेश्वरी पारायण,८ ते ९ प्रवचन,९ ते १० नामपर प्रवचन, १० ते ११नामचिंतन,११ ते १२ महाप्रसाद,दुपारी २ ते ४.३० संगीत संत चरित्र,४.३० ते ६.३० सामुदायिक हरिपाठ, संध्याकाळी ७ ते ९ हरिकिर्तन त्यानंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
पंचदिनी सोहळयात रात्री ७ ते ९ यावेळेत होणाऱ्या किर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.शुक्रवारी दि.९ मे रोजी
पंचदिनी सोहळयाचे प्रमुख मार्गदर्शक
महादेव महाराज धाडगे यांच्या सकाळी ९ ते ११ यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने पंचदिनी सोहळयाची सांगता होणार आहे.

 नजिक चिंचोली येथील नामसाधना अध्यात्मिक आश्रमामध्ये सुरू झालेल्या पंचदिनी सोहळयात होणाऱ्या प्रवचन व किर्तनांचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महादेव महाराज धाडगे व नामसाधना अध्यात्मिक आश्रम भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!