नेवासा
मुबंई पोलीस अधिनियम कलम १९५१ चे कलम ५५ अन्वये दोन वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्हयातुन हद्दपार करण्यात आलेला नदीम सत्तार चौधरी या समास नेवासा पोलिसांनी ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे.
यबाबद अधिक माहिती अशी नकी, बुधवार दि.०७ रोजी नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मुबंई पोलीस अधिनियम कलम १९५१ चे कलम ५५ अन्वये दोन वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्हयातुन हद्दपार करण्यात आलेला इसम नामे नदीम सत्तार चौधरी हा नेवासा ते खुपटी रोड परिसरात आल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ प्रभारी अधिकारी यांनी पोलीस स्टाफला सदर बातमीचा थोडक्यात आशय सांगुन सपोनि अमोल पवार, पोहेकॉ अजय साठे, पोकों अवि वैदय, पोकॉ भारत बोडखे, पोकॉ गणेश जाधव यांना रवाना केले असता तुकाराम महाराज चौक नेवासा खुर्द ते इदगाह परिसरात पेट्रोलिंग करित असताना हद्दपार इसम नामे नदीम सत्तार चौधरी हा इदगाह मैदान नेवासा खुर्द समोर मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टाफ यांनी त्याचे नाव-गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नदीम सत्तार चौधरी रा. खाटीक गल्ली, नेवासा खुर्द ता नेवासा असे सांगुन त्यास अहिल्यानगर जिल्हयाचे कार्यक्षेत्रात परत आले बाबत हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची अगर न्यायालयाची कोणतीही लेखी परवानगी घेतले बाबत विचारणा केली असता अशी कोणतीही लेखी परवानगी मी घेतली नसल्याचे सांगितले.
त्याअनुषंगाने त्यास ताब्यात घेवुन इसम नामे नवीम सत्तार चौधरी रा. खाटीक गल्ली, नेवासा खुर्व ता नेवासा याने हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची अगर न्यायालयाची कोणतीही लेखी परवानगी शिवाय अहिल्यानगर जिल्हा सिमा हददीअंतर्गत नेवासा पोस्टे येथे मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोकॉ अरविंद वैदय यांचे फिर्यादी वरुन नेवासा पोस्टे गुन्हा रजि नं ४६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २२३ सह मुबंई पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, श्री राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, सपोनि अमोल पवार, पोहवा अजय साठे, पोकॉ अरविंद वैदय, पोकॉ भारत बोडखे, पोकॉ गणेश जाधव यांचे पथकाने केली आहे.