Friday, February 13, 2026

सौंदाळा ग्रामसभेत अनोखा ठराव;”हुंडा घेणारा कळवा आणि ५००० रूपये मिळवा”

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हुंडा बंदीचा ठराव घेवून घेतल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली. हुंडा घेणाऱ्यांची माहिती कळवा आणि ५००० रूपये मिळवा अशी घोषणा ग्रामसभेत करण्यात आली.

नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाज हिताचे निर्णय घेत असते त्यामध्ये शिवी बंदी विधवा पुनर्विवाह असे वेगवेगळे महिला सन्मानार्थ,विद्यार्थ्यांच्या हिताचे व गावाच्या हिताचे वेगवेगळे ठराव निर्णय सौंदाळा ग्रामपंचायत मार्फत घेतली जातात. महाराष्ट्रात गाजत असलेले वैष्णवी हागवणे प्रकरणावर चर्चा करून असे प्रकार घडू नये यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे असे मत सौ श्रद्धा सचिन आरगडे यांनी व्यक्त केले. त्यावर गुरुवार दि.११ जून रोजी झालेल्या सौंदाळा गावच्या ग्रामसभेत हुंडा घेणारा कळवा आणि ५००० रुपये बक्षीस मिळवा असा ठराव करून गावातील एखाद्या कुटुंबात महिलेवर कौटुंबिक मानसिक शारीरिक अपशब्द वापरून बाहेरून पैशाची मागणी असे वेगवेगळे प्रकारचे हिंसाचार ते कुटुंब त्या स्त्रीवर करत असेल आणि अशी माहिती ग्रामपंचायतला कोणी पुराव्यासहित कळवली त्या व्यक्तीला २१०० रुपये बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहे.

यामध्ये ग्रामपंचायत मार्फत एक समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामध्ये स्वत: सरपंच अध्यक्ष व त्यांच्यासोबत इतर गावातील दहा महिला असे एकूण ११ जणांची समिती नेमण्यात आली. समितीकडे आलेली तक्रार ही हुंडा घेणे किंवा देणे यासंदर्भात किंवा कौटुंबिक हिंसाचार संदर्भात असेल तर त्या तक्रारीची समिती मार्फत शहानिशा करून हुंडा घेणारे व देणारे किंवा कौटुंबिक हिंसाचार करणारे कुटुंब यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यास मदत व माहिती पुरवणाऱ्या नागरिकास त्याची बक्षीस म्हणून रक्कम दिली जाईल.

या ठरावामुळे आम्ही हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणारे नाही अशी मानसिकता ग्रामपंचायत मार्फत गावकऱ्यांमध्ये रुजवली जाईल. तसेच सुनेला मुलगी म्हणून वागणूक मिळेल. गावातील एखाद्या महिलेला मुल होत नसेल आणि त्यामध्ये तिची वैद्यकीय दृष्ट्या कुठलीही चूक नसेल तरीदेखील कुटुंबातील व्यक्ती परिसरातील व्यक्ती त्या स्त्रीवर अपशब्द वापरून उदाहरणार्थ वांजोटी,पांढऱ्या पायाची यांसारखे शब्द वापरून मानसिक त्रास देत असतात तसेच एखाद्या स्त्रीचा दारू पिणारा नवरा तिला रोज संध्याकाळी मारतो, मानसिक त्रास देतो शारीरिक त्रास देतो आणि ती देखील समाजाच्या भीतीपोटी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असते या ठरावामुळे ज्या स्त्रियांवर असे अत्याचार होतात त्या अत्याचारांना वाचा फुटणार आहे व त्या स्त्री ला एक प्रकारचा आधार देखील मिळणार आहे.या ठरावामुळे गावातील आपले माहेर बाहेर सोडून आलेल्या आई-वडील, भाऊ सोडून आलेल्या लेकी मध्ये आनंदाचे वातावरण आहे. जणू ही एक सौंदाळा गावचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी गावातील सुनांना/लेकिंना दिलेली एक ओवाळणी भेटच आहे.
ग्रामसभेला उपसरपंच भिवसेन गरड,
ग्रामविकास अधिकारी श्रीमती प्रतिभा पिसोटे,गणेश आरगडे, राजेंद्र चामुटे,बंडू आरगडे, दादासाहेब आरगडे, बाळासाहेब आरगडे, ज्ञानदेव आरगडे,बबन आरगडे, कृष्णा चामुटे,ज्ञानदेव चामुटे,सुनील आरगडे,बालु आरगडे,आसाराम आरगडे,अनिल आरगडे,दीपक मगर,जनार्धन आरगडे,अनिल आरगडे,शिवाजी आरगडे,श्रद्धा आरगडे,राणी आरगडे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!