नेवासा
नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना कामगार युनियनचे सरचिटणीस डी.एम. निमसे यांची महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची कार्यकारी मंडळ व वार्षिक जनरल कौन्सिल बैठक सोलापूर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथे
प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
त्यात प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष पदी राजेंद्र चव्हाण (राजारामबापू कारखाना),सरचिटणीस पदी राऊ शंकर पाटील (कोल्हापूर) तर उपाध्यक्ष पदी डी.एम. निमसे (मुळा कारखाना) यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी दिवंगत सरचिटणीस शंकरराव भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्याध्यक्ष अविनाश आपटे,उपाध्यक्ष
युवराज रणवरे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे,
प्रदीप शिंदे,राजेंद्र तावरे,संजय पाटील, सयाजी कदम,चंद्रशेखर कलगे, विजय पाटील,ज्ञानदेव पाटील, सचिन कोकाटे, विजय पाटील,अशोकराव आरगडे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.निमसे यांच्या नियुक्तीबद्दल ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी आमदार शंकरराव गडाख व मुळा कारखान्याचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.