Saturday, October 23, 2021

नगरमध्ये गृहराज्यमंत्री देसाई यांचे विधान भाजप नेत्यांकडून राज्यात…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई  परभणीकडे जात असताना काही वेळ नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येऊन खा. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे.

हे सरकार 25 वर्षे टिकणार असून भाजप नेत्याकडून वेळोवेळी सरकार पडणार अशी वक्तव्य करून राज्यात अस्थैर्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. पावणे दोन वर्षात सरकारवर अनेक नैसर्गिक, आर्थिक संकटे आली. या सर्व संकटाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी तोंड देऊन मात केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्याला आता पावणे दोन वर्षे पूर्ण झाली आहे. सरकार स्थापन झालेल्या दिवसापासून भाजपाचे अनेक नेते सरकार कोसळणार, सरकार पडणार, अशी वक्तव्य करत आहेत.

केवळ अस्थैर्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत असल्याची टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.महाराष्ट्रात पुढचे 25 वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!