माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुहा येथून श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर मढी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.दिंडीचे प्रस्थान रविवार दिनाक 10 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता कानिफनाथ देवस्थान येथून होणार आहे.
दिंडीचे यंदाचे प्रथम वर्ष आहे. मोठ्या संख्येने वाजत गाजत दिंडी निघणार आहे.दिंडीला विविध ठिकाणी चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.रविवारी दिंडीचे प्रस्थान झाल्यानंतर दि 12 रोजी मंगळवारी दिंडी मढी येथे पोहचणार आहे. देवस्थानच्या वतीने दिंडीचे स्वागत तसेच भोजणाची व निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
गुहा गावतून प्रथमच पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे तरी गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी सहभागी व्हावे असे आव्हान आदेश प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी केले आहे .