Thursday, February 12, 2026

भेंडा गावचे ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबाची उद्या यात्रा

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबांची उद्या सोमवार दि.११ ऑगस्ट रोजी यात्रा आहे.
         
दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी श्रीसंत नागेबाबांची यात्रा भरते. यात्रे निमित्त श्रीक्षेत्र आळंदी येथील गुरुवर्य  मिराबाई महाराज मिरीकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने  श्रीक्षेत्र नागेबाबा देवस्थानचे अंकुश महाराज कादे यांच्या उपस्थितीत दि.५ पासून नागेबाबा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सूरु आहे. सप्ताह काळात अंकुश महाराज कादे,महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज, एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, देविदास महाराज म्हस्के, उमेश महाराज दशरथे, कृष्णा महाराज नवले,
यांची कीर्तन झाली. यात्रेच्या दिवशी  सोमवार दि.११ रोजी सांयकाली ७ वाजता गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर यांचे कीर्तन होईल.

यात्रेच्या दिवशी संत नागेबाबांचे पादुका व गंगेच्या पाण्याची सवाद्य मिरवणूक काढली जाते.दुपारी नागेबाबांचे समधीस जलाभिषेक करण्यात येऊन दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आमटीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येते. सायंकाळी उपस्थित भाविकांना आमटी-भाकरीचा प्रसाद
हे यात्रेचे तर गावात एक ही आंब्याचे झाड नाही हे या गावचे वैशिष्टय आहे. गावातील बाहेर गावी नोकरीस असलेली माणसं, लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली यात्रेसाठी आर्वजून उपस्थित राहतात.

 मंगळवार दि.१२ रोजी स.९ ते ११ यावेळेत  महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!