नेवासा
नेवासा तालुक्यातील पानेगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेश प्रल्हाद जंगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे संचालक संजय जंगले होते. ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी उपसरपंच निवड कार्यक्रमाची माहिती दिल्यानंतर जंगले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच निकिता भोसले-आंबेकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
ग्रामपंचायत सदस्य कुसुम शेंडगे, शांताबाई जंगले, दिपाली जंगले, रमेश जंगले,रंजना जाधव, चंद्रकला गुडधे,मिना जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, माजी उपसरपंच रामराजे जंगले,सतिश जंगले, नामदेव गुडधे,माजी सरपंच हौशाबापू जंगले,गंगाधर जंगले, किशोर जंगले, सुरज जंगले, अमित जंगले,चाचा जंगले,नारायण जंगले,पोपटराव पाटील संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जंगले उपाध्यक्ष दादासाहेब काकडे रमेश गुडधे, अर्जुन जंगले तानाजी गायकवाड,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जंगले, संचालक जालिंदर जंगले,राजेंद्र जंगले साहेबराव जंगले, दादासाहेब तनपुरे, मुकुंद घोलप, शिवाजी शेंडगे बाबासाहेब शेंडगे, गणेश गायकवाड, शुभम जंगले, रविंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर कल्हापुरे, राजेंद्र वाघमारे, बंडू जंगले,आण्णासाहेब जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे विक्रम जंगले,बाळासाहेब नवगिरे, किशोर जंगले, आभार ज्ञानेश्वर जंगले
यावेळी उपस्थित होते.
माजी आमदार शंकरराव गडाख व माजी सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासात्मक कामास अग्रक्रम देण्यात येईल, असे उपसरपंच सुरेश जंगले यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.