कोपरगांव/प्रतिनिधी
कुंभमेळ्यामध्ये कोपरगाव येथील गोदावरीचा अंतर्भाव व्हावाअशी मागणी गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने विभागीय उपायुक्त राणी ताठे यांचे केली आहे.
गोदामाई प्रतिष्ठानने विभागीय उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे अनुषंगाने कोपरगाव (जि.अहिल्यानगर) येथील आई गोदावरीचे प्रदुषण निर्मुलन करण्यात यावे. कोपरगाव शहरातील सर्व सांडपाणी आणि मलमुत्रयुक्त गटारी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आल्या आहेत त्यामुळे कोपरगाव शहर परिसरात गोदावरी नदी १००% प्रदूषित झालेली आहे. प्रदुषित पाण्यामुळे दर वर्षी लाखो मासे मरतात, लोकांना त्वचेचे आजार होतात यामुळे येथील पाणी वापरणे किंवा पिण्यायोग्य राहिले नाही.
सन २०२७ ला त्र्यंबकेश्वर नाशिक येथे कुंभमेळा आहे. तेव्हा खुप सारे भाविक शिर्डी येथे श्री साईबाबा आणि कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या दर्शनासाठी येतील त्यावेळी त्यांना गोदावरी नदी प्रदूषित असल्यामुळे तेथे स्नान किंवा पूजापाठ करता येणार नाही. तरी आपण कोपरगाव येथील गोदावरी नदीला कुंभमेळा २०२७ यामध्ये समाविष्ट करून अविरल निर्मल वाहण्यासाठी मदत करावी अशी मागणी कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक विभागीय उपआयुक्त राणी ताटे यांना गुरुवार दि .२८ ऑगस्ट रोजी निवेदन देत केली आहे.
सदर निवेदन देते प्रसंगी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, उपाध्यक्ष प्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय उदगिरकर, नाशिक येथील नमामी गोदाचे राजेश पंडित आदी यांनी देत केली आहे.
तसेच या निवेदनात कोपरगाव च्या ऐतिहासिक बाबीचा उल्लेख करत कोपरगाव येथील गोदावरी नदी वरील लहान पुलाला जाळ्या बसवणे जेणेकरून लोक पुलावरुन खाली नदीपात्रात कचरा टाकणार नाही तर कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड, रक्षा टाकण्यासाठी रक्षा कुंड व देव देवतांचे फोटो व मुर्ती टाकणेकरीता कुंड मिळावा अशी मागणी देखील या निवेदनातुन केली आहे.