गुहा: राहुल कोळसे:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्क्वॅश व रॅकेट मुलांच्या स्पर्धे मध्ये 28 शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये राहुरी तालुक्यातील गुहा येथील ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा सातवीचा विद्यार्थी साई विजय कोळसे १४ वर्ष गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवत जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यास प्राप्त झाली आहे. १७ वर्ष वयोगटांमध्ये दहावीचा विद्यार्थी यश विक्रम जाधव अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळवत शाळेचे नाव उज्वल करत विभाग स्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली आहे. दोन्ही मुलांची विभाग स्तरावर निवड झाल्याने राहुरी तालुक्यात संपूर्ण खेळामध्ये ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलचा प्रथम क्रमांकचा दब दबा पाहावयास मिळत आहे.
विद्यालयाचे खेळाचे शिक्षक सौरभ वरखडे यांच्या प्रत्येक खेळाचे मार्गदर्शन, अचूक शिकवण देत तालुक्यात प्रथम क्रमांक चे क्रीडा शिक्षक म्हणून ओळखले जातात. पुढील स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव शेलार, सेक्रेटरी मनीषा शेलार ,उपाध्यक्ष संभाजी हरण, मार्गदर्शक संचालक मेजर चंद्रकांत सौदागर , माजी मुख्याध्यापक वसंतराव जाधव, प्राचार्य औदुंबर कडू ,उपप्राचार्य अरुण पारखे, कोऑर्डिनेटर अमोल तोडमल, अर्जुन मुसमाडे, विजय कोळसे व शाळेचे संचालक विक्रम जाधव यांनी पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.


