नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाने लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत नागपूरच्या संताजी महाविद्यालाचा अनिकेत वनारे हा विद्यार्थी प्रथम क्रमांक विजेता तर पारनेरच्या आर्ट्स कॉलेजचा आकाश मोहिते व नगरच्या न्यू लॉ कॉलेजची हर्षिता गायकवाड हे अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त दि. १२ व दि. १३ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा शुभारंभ दि.१२ रोजी माजी श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते झाले. काशिनाथ नवले, अशोकदादा मिसाळ, शिवाजीराव कोलते, प्रा. डॉ. नारायण म्हस्के, शिक्षण संस्थेचे सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे, परीक्षक प्रा. डॉ. गजानन लोंढे, परीक्षक प्रा. डॉ. बाबासाहेब फलके, सरपंच शरद आरगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल आदि यावेळी उपस्थित होते.

माजी आ. पांडुरंग अभंग यांनी, स्पर्धकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनतीने तयारी करावी लागते, हे काम अवघड असले तरी आपल्या जवळील ज्ञान व्यक्त करता येणे व स्पर्धेतून प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार केले.
या वकृत्व स्पर्धेत राज्यभरतील ४१ स्पर्धकांनी भाग घेतला.प्रा.डॉ.गजानन लोंढे, प्रा.डॉ. बाबासाहेब फलके यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
दि.१३ रोजी शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ.क्षितिज घुले पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, प्रा.डॉ.नारायण म्हस्के,
शिक्षण संस्थेचे सहसचिव रवींद्र मोटे, परीक्षक प्रा. डॉ. गजानन लोंढे, परीक्षक प्रा. डॉ. बाबासाहेब फलके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल आदि यावेळी उपस्थित होते.
डॉ.क्षितिज घुले म्हणाले की,”वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर; श्रवण, वाचन, आकलन हे उत्तम असले पाहिजे. जीवनातही हे सूत्र महत्त्वाचे ठरत असते, म्हणून नेहमी आपले डोळे आणि कान उघडे ठेवून अधिकाधिक ज्ञान मिळवत जीवन यशस्वी करावे.”
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे म्हणाले की, “ग्रामीण भागातील या महाविद्यालयात अनेक सुविधा उपलब्ध असल्याने यापुढिल काळात महाविद्यालयाने मोठ्या स्पर्धांचे संयोजन करावे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होईल.”
शास्त्र शाखाप्रमुख प्रा.केशव चेके, कला शाखाप्रमुख प्रा. डॉ. काकासाहेब लांडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ.दत्ता वाकचौरे, स्पर्धा संयोजन समितीतील प्रा. डॉ. रोहन नवले, प्रा. डॉ.अनुराधा बोठे, प्रा. देविदास सोनवणे, रवींद्र पाटील, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.
डॉ.अशोक सागडे यांनी प्रास्ताविक
केले. प्रा. डॉ. मोहिनी साठे यांनी
सूत्रसंचालन केले. प्रा.मिना पोकळे यांनी आभार मानले.
‘लोकनेते मारुतरावजी घुले पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे विजेते असे…
*प्रथम क्रमांक:– अनिकेत रामा वनारे, संताजी महाविद्यालय,नागपुर(११ हजार रुपये)
*व्दितीय क्रमांक:– आकाश मोहिते,न्यू आर्ट्स कॉलेज,पारनेर(७ हजार रुपये)
*तृतीय क्रमांक:– हर्षिता गायकवाड,न्यू लॉ कॉलेज,अ.नगर(५ हजार रुपये)
*उत्तेजनार्थ:– विश्वास दसगुडे, सि.टी. बोरा महाविद्यालय, शिरूर व अक्षदा वडवणीकर,होमिओपॅथिक कॉलेज अहमदनगर (प्रत्येकी १ हजार रुपये).




