ठाणे
३२ कोटींचे एमडी पकडल्यबद्दल गुन्हे शाखा घटक क्र.२, भिवंडी, ठाणे शहर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन सिंधू भिकन सोनवणे यांना ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले.
श्री.सोनवणे यांनी कोनगाव पोलीस ठाणे, गु.र.नं.४२७/२०२५, NDPS Act कलम ८ (क), २२ (क) २९ या गुन्हयात गुप्त बामतीदार मार्फतीने बातमी प्राप्त करुन त्याआधारे छापा कारवाई करुन दोन आरोपींकडून १५ किलो ९२४ ग्रॅम वजनाच्या मेफेड्रान (MD) या अंमली पदार्थसह स्विफ्ट डिझायर BMW कार असा एकूण ३२,२०,१०,१४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तपासा दरम्यान सोनीपत, हरियाणा येथील MD तयार करण्याचा कारखाना निष्पन्न करुन एकूण ७आरोपींना अटक केली. या उल्लेखनीय कामगिरी बाबत त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.




